थायरॉईड मुळे वाढलेले वजन करा नियंत्रित how to manage weight in thyroid

थायरॉईड मुळे वाढलेले वजन करा नियंत्रित

थायरॉईड ची समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त पाहायला मिळते. जर आपल वजन काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढत किंवा कमी होत असेल तर हे सर्व लक्षणे थायरॉईड डीसऑर्डरची असू शकतात. थायरॉईड एक असा आजार आहे ज्यामुळे रुग्ण इतर आजारांनी ही ग्रस्त होऊ शकतो. यासाठी मेडिकल टेस्ट आणि उपचाराचा विशिष्ट कोर्स पूर्ण करायला हवा. हा आजार आपल्या हाडांवर ही परिणाम करतो म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने विटामिन सप्लीमेंट आणि कॅल्शियमचा वापर करणं गरजेचं असतं.

थायरॉईड मुळे वाढलेले वजन करा नियंत्रित how to manage weight in thyroid

1) थायरॉईड रुग्णांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांनी आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. आहारात कमी तळलेले पदार्थ सेवन करा. थायरॉईड रुग्णांना अन्न पचविणे थोडे कठीण जाते त्यामुळे त्यांनी जेवण केल्यानंतर थोडे चालणे आवश्यक आहे.

2) डॉक्टर्स थायरॉइडचा रुग्णांना दररोज काही वेळ उन्हात बसण्याचा सल्ला देतात व आयोडीन,हिरव्या पालेभाज्या, लसूण, तिळ, मशरूम खाणे या रुग्णासाठी फायदेशीर ठरते.

3) बरेच लोक थायरॉईड औषधाबरोबर वजन कमी करण्यासाठी औषधे देखील घेतात. परंतु असे केला ने त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

4)थायरॉईड रुग्णांसाठी सकाळ-संध्याकाळ चालणे खूप महत्त्वाचे आहे. थायरॉईड ग्रंथी योग्यरीत्या कार्य करत नसल्यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते यामुळे ते परत मिळवण्यास मदत होईल तसेच वजन नियंत्रित राहील.

5) आपण थायरॉईडमध्ये ग्रीन टी पिल्याने आपल्या वजन वेगाने कमी होण्यास सुरुवात होते यासाठी दिवसातून दोन ते तीन वेळा ग्रीन टी प्या.

6) आपण चालना व्यतिरिक्त योग देखील करू शकता योग केल्याने वजन नियंत्रित करणार नाही तर थायरॉईड समस्याच वाढण्यापासून प्रतिबंधित करेल.

Leave a Comment

x