शैक्षणिक कर्ज कसे घ्यायचं?Education Loan

शैक्षणिक कर्ज कसे घ्यायचं?

जर तुमच्या घरातील कोणाला शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घ्यायचे असेल तर त्यापूर्वी त्या संबंधित सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

शैक्षणिक कर्ज कसे घ्यायचं?Education Loan

जर तुम्हाला देशातील मोठ्या विद्यापीठात प्रवेश घ्यायचा असेल किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात जायला जायचे असेल तर त्यासाठी तुम्ही शैक्षणिक लोन घेऊ शकता. पैशांअभावी आपण उच्च आणि दर्जेदार शिक्षण घेऊ शकत नाही. बुद्धिमत्ता असून सुद्धा अनेक जण पैशाअभावी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. आता कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या असल्यास तुम्ही शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेऊन आपले शिक्षण पूर्ण करू शकता.

शैक्षणिक कर्जाविषयी जाणून घेऊ या. उच्च शिक्षणासाठी कोणती बँक किंवा खासगी संस्थेकडून घेतलेल्या कजाला विद्यार्थी कर्ज किंवा शैक्षणिक कर्ज असेसुद्धा म्हणतात.अशा प्रकारचे शिक्षण शैक्षणिक कर्ज घेऊन विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करू पूर्ण करू शकतो.भारतामध्ये साधारणपणे चार प्रकारचे विद्यार्थी कर्ज आहेत.

1 करियर एज्युकेशन लोन -जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला सरकारी कॉलेज किंवा संस्थेमधून शिक्षण घेऊन करिअर करायचे असेल तेव्हा त्याला करिअर एज्युकेशन लोन असे म्हणतात.
2 प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन- प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंट लोन ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर पुढील अभ्यासक्रमांसाठी सुरू ठेवण्यासाठी घेतले जाऊ शकते.
3 पालक कर्ज -जेव्हा पालक आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कोणत्या बँकेकडून किंवा खासगी संस्थेकडून कर्ज घेतात तेव्हा त्याला पालक कर्ज म्हणतात.
4 अंडरग्रॅजुएट लॉन-शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर देशात किंवा परदेशात पदवी मिळविण्यासाठी पदवीपूर्व कर्ज घेतले जाते.

विद्यार्थ्याला जर शैक्षणिक कर्ज घ्यायचे असेल तर पुढील गोष्टी आवश्यक आहेत

– सर्वप्रथम आपली बँक किंवा संस्थां निवडा त्यानंतर विद्यार्थी कर्जाची सर्व माहिती मिळवा.
– बँकेने दिलेले व्याजदर नीट समजून घ्या बँकेने सांगितलेल्या सर्व नियमांचे पालन करा.
– बँक आणि तुमची खात्री झाल्यानंतर कर्जासाठी अर्ज करा

आवश्यक कागदपत्रे
वयाचा पुरावा, पासपोर्ट साईज फोटो, मार्कशीट, बँक पासबुक, आयडी प्रुफ, ॲड्रेस डिटेल्स, विद्यार्थी आणि पालकांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड पालकांचा उत्पन्नाचा दाखला हे आवश्यक कागदपत्रे लागतात.

Leave a Comment

x