आजच ई-श्रम कार्ड बनवा आणि घ्या अनेक फायदे E-shram card

आजच ई-श्रम कार्ड बनवा आणि घ्या अनेक फायदे

केंद्र सरकारने ई-श्रम (E-shram)पोर्टल सुरू केले आहे. या वेबसाइट किंवा प्लॅटफॉर्म वर असंघटीत क्षेत्रातील कामगारांना दोन लाख रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. हा असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिल्या जाईल.जे एक वर्षासाठी असेल.

आजच ई-श्रम कार्ड बनवा आणि घ्या अनेक फायदे E-shram card

असंघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. तुम्ही जरा असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असाल तर हे श्रम कार्डसाठी अर्ज केला नसेल किंवा या कार्ड साठी पात्रता काय आहे याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर ई-श्रम(E-shram) म्हणजे काय आणि या कार्ड साठी काय पात्रता हवी आहे हे जाणून घेऊया.

असंघटित क्षेत्रातील कामगार देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे ई-श्रम कार्डसाठी(E-shram card) अर्ज करू शकतात यामध्ये बांधकाम क्षेत्रातील कामगार,स्थलांतरित मजूर, फेरीवाले,घर कामगार स्थानिक रोजंदारी कामगाराचा, भूमिहीन शेतमजूर व इतर काही असंघटित कामगारांची नोंदणी या संकेतस्थळावर करता येईल. संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी 14 434 हा राष्ट्रीय निशुल्क संपर्क क्रमांक तयार करण्यात आला असून कामगारांना मार्गदर्शन आणि शंकांचे निरसन केले जाते .कामगारांना आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक याच्या साहाय्याने ई-श्रम(E-shram) संकेतस्थळावर नोंदणी करता येईल संकेत स्थळावर असंघटित कामगारांना आवश्यक ती माहिती द्यावे लागेल. कामगारांना बारा अंकी युनिकोड असलेले ई-श्रम ओळखपत्र दिले जाईल. त्यामध्ये सामाजिक सुरक्षेच्या विविध योजनांचा देखील समावेश करण्यात येईल. हे श्रम कार्ड साठी वय 16 पेक्षा जास्त आणि 59 वर्षापर्यंतचा कोणताही कामगार पोर्टल वर स्वतःची नोंदणी करू शकतो. यावर वयामधील कोणतीही व्यक्ती कार्ड म्हणू शकतो.

ई-श्रम पोर्टल (E-shram portal)वर नोंदणीसाठी काही गोष्टी अत्यंत आवश्यक आहे. असंघटित क्षेत्रात काम करणारे जे कामगार आहेत जे आयकर देत नाहीत म्हणजे जर कामगार करदाता असेल तर त्यालाही श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचा अधिकार नाही. फक्त तिथे असाच कामगार नोंदणी करू शकतो जो ईपीएफ,ESIC किंवा NPS चा सदस्य नाही.

Leave a Comment

x