आज पासून कोरोना लसीचा तिसरा डोज(बूस्टर डोज) मिळणार Covid Booster Dose

आज पासून कोरोना लसीचा तिसरा डोज(बूस्टर डोज) मिळणार

देशामध्ये 10 जानेवारीपासून कोरोना लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोज(Booster Dose) दिला जाणार आहे.

आज पासून कोरोना लसीचा तिसरा डोज(बूस्टर डोज) मिळणार Covid Booster Dose

देशात कोरोना वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी(health worker),फ्रंटलाईन वर्कर्स(frontline workers) आणि 60 वर्षावरील व्यक्तींना बूस्टर डोज देण्याची तयारी करण्यात आलेली आहे. हा बुस्टर डोस घेण्यासाठी ऑनलाईन अपॉईंटमेंट ची सुविधा Cowin साईड वर देण्यात आलेली आहे. जे बुस्टर डोस घेण्यास पात्र आहेत त्यांनी ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्याचे आव्हान करण्यात आलेला आहे. Cowin वर आपण ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊ शकता.

आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की कोरोना कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. ज्या लोकांना covid-19 दोन डोज मिळाले आहेत ते कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन लसीचा बूस्टर डोज (Booster Dose) घेऊ शकतात किंवा वाक इन घेऊ शकतात. 10 जानेवारीपासून बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 60 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना तिसरी लस म्हणून बूस्टर डोस देण्याची घोषणा केली होती.या नागरिकांबरोबरच आरोग्य कर्मचारी(health worker) आणि फ्रंटलाईन वर्कर(frontline workers) कर्मचाऱ्यांना देखील बूस्टर डोज दिल्या जाईल.बूस्टर डोस देण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केलेले आहेत comorbidity असल्याचे दाखवण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र प्रिस्कीप्शन ची आवश्यकता नाही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुस्टर डोज घेण्यात यावा ज्यांचा दुसरा डोज घेऊन नऊ महिने पूर्ण झाले असतील अशांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

Leave a Comment

x