तांदळाचे पाणी केसांसाठी फायदेशीर जाणून घ्या फायदे Benefits of Rise water

तांदळाचे पाणी केसांसाठी फायदेशीर जाणून घ्या फायदे

केसांची निगा आपण घेत असतो. पण कमी वयातच केस पातळ होणे, पांढरे होणे,केसांमध्ये कोंडा तयार होणे, या समस्यांना सामोरे जावे लागते. पण साध्या तांदळाचा उपयोग जर केला तर आपले केस दाट, काळे, मुलायम, चमकदार होतील. तर जाणून घेऊ या तांदुळाचा उपयोग केसांसाठी कसा करणार.

तांदळाचे पाणी केसांसाठी फायदेशीर जाणून घ्या फायदे Benefits of Rise water

तांदळामध्ये इनोसिटोल नावाचे बी जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. जे केसांच्या वाढीसाठी मदत करते. एक वाटी तांदूळ जर राशन चे असेल तर उत्तम. एक वाटी तांदूळ रात्रभर भिजत ठेवा. सकाळी आंघोळीच्या वेळी तांदळाच्या पाण्याने केसांची मसाज हलक्या हाताने करा,जसे आपण शाम्पू लावतो त्याप्रमाणे, नंतर केस धुऊन घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळेस हा प्रयोग करणे उत्तम, जाणून घ्या फायदे.

1) तांदळाचे पानी केस वाढीसाठी मदत करतात.

2) तांदळाच्या पाण्याचा वापर केल्याने अकाली केस पांढरे होत नाहीत.

3) नॅचरल कंडिशनर म्हणून तांदळाचे पाणी उत्तम आहे.

4) केस मऊ चमकदार आणि मजबूत होतात.

5) तांदळाच्या पाण्याने डोक्यातील कोंडा ची समस्या दूर होते.

6) डोक्यामध्ये उवा होत नाहीत.

7) अकाली केस पांढरे सुद्धा होत नाहीत.
मित्रांनो हा प्रयोग घरच्या घरी आपण करत राहिले तर आपले केस हे चमकदार मुलायम काळे सुद्धा होतील.

Leave a Comment

x