आता जखमीला रुग्णालयात पोहोचवनाऱ्यास मिळणार बक्षीस Accident Injuries

आता जखमीला रुग्णालयात पोहोचवनाऱ्यास मिळणार बक्षीस

केंद्र सरकारची नवीन योजना रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या यांचे प्रमाण वाढतच आहे.अशा जखमी रुग्णांना रुग्णालयात पोहोचविण्यास केंद्र सरकारने नवीन योजना जाहीर केली आहे.

आता जखमीला रुग्णालयात पोहोचवनाऱ्यास मिळणार बक्षीस Accident Injuries

रुग्णाला जर एका तासाच्या आत रुग्णालयात पोहोचलयास बक्षीस देण्यात येणार आहे या योजने अंतर्गत संबंधित मदत करणाऱ्या व्यक्तीला 5000 रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे. सदर योजना ही 15 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2026 पर्यंत लागू असेल असेही म्हटले आहे.

मदत करणाऱ्या व्यक्तीस बक्षीस देण्यासंदर्भात एक नियमावली जाहीर केली आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की आणीबाणीच्या स्थितीत रस्त्यावरील अपघात ग्रस्तांना मदत करण्यासाठी सामान्य नागरिकांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे याशिवाय या योजनेअंतर्गत संबंधित मदत करणाऱ्या व्यक्तीला रोख पुरस्कार सोबत एक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे एवढेच नव्हे तर या पुरस्कारा शिवाय राष्ट्रीय स्तरावर 10 सर्वात प्रामाणिकपणे सहकार्य करणाऱ्यांना एक एक लाख रुपयांचा पुरस्कारही देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment

x