adolescent in marathi,किशोरावस्था काळजी व जबाबदारी

किशोरावस्था

मुलाचे पौगंडावस्था आणि मुलाचे यौवनातले पहिले पाऊल हे त्यांच्या जीवनातल्या अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात. मुलांना या बद्दल सांगणारे पुष्कळ जण असतात. भाऊ असतात, मित्र असतात,असल्या विषयावर ते अगदी खुल्या मनाने बोलू शकतात. मुलगी वयात येण्यापूर्वी स्त्री म्हणून तिचे जीवन निसर्गनियमाप्रमाणे सुरू होण्यापूर्वीच तिच्या मनाची तयारी करणे, त्याच्या मनाची एक मशागत करून ठेवणे. मुख्यतः मुलीच्या आईचे किंवा आई नसलेल्या मोठे बहिणीचे आणि शाळेतल्या तिच्या शिक्षकायचे हे काम असते. शंभर वर्षापूर्वीच्या काळी म्हणजे जेव्हा मुलगी वयात येण्यापूर्वी तिचे लग्न होत असे.तेव्हा बालविवाहाची प्रथा होती. त्या काळात त्या काळातल्या स्त्रियांना अनेक अडचणी येत होत्या. पण आता समाज बदललाय मुलींच्या वागण्यात खूप मोठा बदल झाला आहे. घरातल्या वातावरणात सुद्धा प्रसन्न,मोकळेपणा आला आहे.सॅनेटरी नॅपकिन चा जाहिराती सिनेमागृहात आणि टीव्हीवर सुद्धा दाखवल्या जातात. बहुतेक शाळेमधून आता शरीरशास्त्र हा विषय शिकवताना स्त्री शरीराचे आणि शरीर धर्माची ओळख मुलींना करून दिली जाते. पण शाळेपेक्षा ही मुलीचे मन तयार करण्याची मुख्य जबाबदारी मुलीच्या आईची आहे.

वयात येणाऱ्या मुलीच्या आईची जबाबदारी

मुलगी वयात येत असल्यामुळं तिच्यात होणारे मानसिक बदल प्रामुख्यानं तिच्या आईनं समजून घेतले पाहिजे, आणि तिच्याशी समजून वागलं पाहिजे. तिच्या स्वभावात बदल झाल्यामुळे तिच्यावर कोणत्याही परिस्थितीत रागवता कामा नये. तिच्या वागणुकीतील बदल आईने स्वीकारायला हवे. आता आपली मुलगी विकसित होत आहे हे लक्षात घेऊन आईनं मुलीला आता आदराची, बरोबरीची वागणूक द्यायला हवी. प्रत्येक मुलीला पाळी म्हणजे काय याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. पाळी येणे या अनिष्ट गोष्ट नसून ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि पाळी येणे ही एक आनंदाचीच घटना आहे. त्याला समजावून दिले पाहिजे काही आई आपल्या मुलीला पाळी आली की ही गोष्ट इतर कुटुंबियांपासून लपवून ठेवू पाहतात. सहाजिकच मुलीलाही एक गोष्ट शरमेची वाटू लागते.ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.उलट पाळी न येणे ही एक अनैसर्गिक गोष्ट आहे.

तीन ते पाच दिवस रक्तस्राव होणे ही एक नैसर्गिक बाब असते आणि त्यापेक्षा जास्त दिवस रक्तस्त्राव होऊ लागला तर मात्र तो अयोग्य असतो.हे मुलीना सांगितले पाहिजे. पाळीच्या दिवसात शरीराची स्वच्छता कशी ठेवावी हेही आईनं मुलीला शिकवायला हवे. काही मुलींच्या पोटात पाळी चालू असताना खूपच दुखते काही ना फार दुखत नाही, हे दुःख तसं इतकं तीव्र नसते. पहिल्या एक-दोन वर्ष नियमितपणे पाळी येईलच असे नसते दोन किंवा तीन महिन्यांनी सुद्धा पाळी येऊ शकते यात अनैसर्गिक असे काहीच नसते कारण पाळी दर महिन्याला आली नाही तर मुलींनी घाबरून जाऊ नये. तिच्या मनात भलते विचार येऊ लागतात.

मुलींच्या मध्ये होणारे मानसिक शारीरिक बदल जानून घेऊन पहिल्या पाळीच्या संदर्भात त्याचे मन तयार करणे. पाळी म्हणजे काय याची माहिती करून देणे हे प्रत्येक मुलीच्या आईचे कर्तव्य आहे. पुर्वी च्या वेळी मुलीच्या वेळच्या सभोवतालची परिस्थिती वेगळी होती. एकच कुटुंबपद्धती होती घरात खूप माणसे असायची, बायकांची पाळी, लग्न, गर्भधारणा, बाळंतपण या विषयांवरच्या गोष्टीची चर्चा चालू असायची.पण आता कुटुंबव्यवस्थेत बदलत गेलेली आहे. बहुसंख्या कुटुंब एकत्र नसतात.एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येत चालली आहे. आता मुलांना आपले आई वडील एवढंच आपलं कुटुंब हे माहीत असते. अशा परिस्थितीत कुटुंबातील सगळ्या मुलांची जबाबदारी प्रामुख्यानं आईवरच येऊन पडते. साहजिकच शरीरातील बदल आणि पाळीमधील अशी भीती मुलांच्या मनातून काढून टाकण्यासाठी आईने संपूर्णपणे जबाबदारी स्वीकारणे आणि योग्य रीतीने पार पाडणे आवश्यक असते. मुलीच्या त्या संक्रमणावस्थेत च्या काळात आईनं तिच्याशी हळुवारपणे मैत्रीच्या नात्याने वागून विश्वासात घेऊन मुलींचे मनोधैर्य वाढविण्यासाठी झटल पाहिजे.

मुलगी वयात आल्यानंतर मानसिक बदल

मुलगी वयात आल्यानंतर प्रसन्न दिसू लागते.तिचा अल्लडपणा कमी होतो. मुलांबद्दल आकर्षण वाटू लागते. तिला शारीरिक बदलामुळे तिला आपण मोठ्या झाल्यासारखे वाटू लागते. शरीरात होणाऱ्या बदलांचे आकलन न झाल्याने तिचा संभ्रम निर्माण होतो. तिच्यामध्ये अपराधीपणाची भावना निर्माण होते.

मुलगी वयात आल्यानंतर शारीरिक बदल

मुली अकरा -बारा वर्षाच्या झाली की शरीरातील विशिष्ट भागातील चरबी वाढू लागते.या बदलानंतर तिची मासिक पाळी सुरू होते. प्रत्येक मुलीची मासिक पाळी सुरू होण्याचे वय वेगळे असले तरी साधारणता अकरा ते पंधरा वर्षापर्यंत मुलींची मासिक पाळी सुरू होते. मुलीला मिळणाऱ्या पोषणावर मासिक पाळी सुरू होण्याचे वय काही प्रमाणात अवलंबून असते. काही अशक्त मुलीची पाळी उशिरा सुरू होते. आपल्याकडे मुलींचे मासिक पाळी सुरू होण्याचे वय साडेबारा ते साडे सतरा वर्षे इतक्या आहे. त्यामुळे पंधरा-सोळा वर्षापर्यंत मुलींची मासिक पाळी सुरू झाली नाही तर घाबरून जाऊ नये. त्यानंतर मात्र डॉक्टरी सल्ला घेणे आवश्यक आहे महत्वाचे आहे

वयात येणार्‍या मुलींचे कोणती काळजी घेतली पाहिजे

वयात येत असताना वयात आल्यानंतर मुलांना समतोल आहार मिळणे आवश्यक आहे.ह्याकरता लोहयुक्त खाणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर मुलींच्या मनातील शंकाकुशंका चे निरसन करून त्यांना योग्य ते माहिती देऊन पालकांनी त्यांच्या आधी सांगितल्याप्रमाणे होणारे बदल समजून घेऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व मोकळ्या वातावरणात करू दिले पाहिजे. मुलींचे शारीरिक व्यायाम, खेळ ,छंद,बंद न करता ह्या गोष्टींना प्रोत्साहन दिले पाहिजे. शरीराचे व मनाचे सर्वांगीण वाढ ही मनमोकळे वातावरण यामध्ये होत असते. वयात येत असताना मुलींच्या स्वभावातील बदल ज्याप्रमाणे मुलींच्या शरीररचनेत बदल होतो त्याचप्रमाणे त्यांच्या स्वभावातही बदल होत असतो. मुलांबद्दल अनामिक आकर्षण वाटते. वेशभूषा वर व सुंदर दिसणाऱ्या कडे जास्त लक्ष केंद्रित होते. पालकांपासून एक प्रकारे दूर जाऊन मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारणे किंवा बोलणे हे मुलीला योग्य वाटते.आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांची जाणीव झाल्यामुळे मुलींच्या वागण्यात एक प्रकारचा संकोच, लाजरेपणा निर्माण होतो. ज्या घरातील वातावरण मोकळे असते आई-वडिलांचे मुलामुलींना बरोबर वागणे अति धाकाची असते, त्या घरातील मुलींमध्ये असे बदल प्रकर्षाने जाणवत नाही.परंतु स्वतःच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणाऱ्या संभ्रमाचे निरसन होण्यासाठी पोषक असे वातावरण घरात नसेल तर मात्र मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूनगंड निर्माण होऊ शकतात. या वयात मुला-मुलींना पालकांच्या मार्गदर्शनाची गरज असते.

किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्य व पोषण

साधारणत 12 ते 18 या वयात मुले मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या नाजूक काळातून जात असतात.अठरा वर्षानंतर त्यांना सज्ञान मानले जाते. ह्या वयात त्यांच्या लैंगिक दृष्ट्या बरेच बदल होत असतात. हेच मुले आपल्या देशाचे भावी नागरिक होणार. वाढत्या वयात शरीराला जास्त अन्नाची गरज असते योग्य पोषण मिळाले तर मुला-मुलींचे योग्य वाढ होऊन अपेक्षित उंची वजन आणि स्नायूंची शक्ती प्राप्त होते. अनुकूलता मिळाली तर एका पिढीत हा फरक दिसून येतो. हल्ली पालकांपेक्षा त्यांची मुले जास्त उंच आणि वजनदार होतात, ह्याचे कारण पूर्वीपेक्षा हल्ली जास्त पोषक अन्न मिळते.मुलींच्या पोषणा कडे मात्र कमी लक्ष दिले जाते त्यांच्याकडून काम मात्र जास्त करून घेतले जाते त्यात दर महिन्याला पाळीच्या रक्तस्रावामुळे त्यांना रक्तपांढरी होण्याची शक्यता असते. वजन उंची आणि आरोग्याचे तेज हे चांगल्या आरोग्याचे लक्षणे आहेत. ह्या वयात सकस अन्न मिळणे जरूर पडल्यास देणे महत्त्वाचे असते.खाण्यापिण्याच्या लडामुळे या वयात बऱ्याचदा बाजारातील निकृष्ट दर्जाचे खाण्याची सवय काही मुलांना लागते. पण लहान मुला इतक्या या वयातही सकस खायला महत्त्व आहे.या वयातल्या मुलांचा रोजचा खेळ आणि व्यायाम असला पाहिजे. त्यामुळे त्यांची वाढ व्यवस्थित होते आणि आरोग्य सुधारते. मैदानी खेळ आणि मुख्य म्हणजे गटाने खेळण्याचे खेळ महत्त्वाचे आहेत. मुले खेळ लवकर शकतात, आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवतात योगासनांचा देखील पुढच्या आयुष्यात चांगला परिणाम होतो. खेळणे, व्यायामामुळे त्यांना पुढील आयुष्यातले ताणतणाव सहन करण्याची ताकद येते

किशोरवयीन राष्ट्रीय कार्यक्रम

भारतातील एक पंचमांश लोकसंख्या किशोरवयीन व एक तृतीयांश लोकसंख्या हे 10 ते 24 वयोगटातील तरुणांची आहे भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. एवढ्या मोठ्या संख्येतील किशोरवयीन व युवा देशांच्या सामाजिक व आर्थिक विकास करू शकतात. या युवाशक्तीला ऊर्जा आहे. जिद्द आहे हे खरे असले तरी त्यांच्याकडे अनेक प्रश्न आहेत किशोरावस्था मध्ये शारीरिक व मानसिक अवस्था व संप्रेरक का मध्ये बदल होत असतात. त्यामुळे या अवस्थेतील मुला मुलींना अनेक प्रश्न शंका असतात याची उत्तरे शाळा-महाविद्यालयात मिळत नाही. अशावेळी हे लोक जी माहिती गोळा करतात त्यात त्यांना चुकीची माहिती मिळाली तर त्यांचा प्रवास वेगळ्या वाटेवर घेऊन जाऊ शकतो त्याला आळा घालणने गरजेचे आहे म्हणूनच त्यांच्या शारीरिक माणसे प्रश्नांची सोडून वेळेत व अचूक करणे गरजेचे ठरते.

यासाठी शासनाने केंद्र शासनाने राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम हाती घेतला आहे किशोरवयीन आन करता हेल्पलाइन याचबरोबर अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.कार्यक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे किशोरवयीन मुला-मुलींच्या प्रजनन व लैंगिक आरोग्य यामध्ये सुधारणा करणे बालमृत्यू मातामृत्यू दर प्रसूती काळात निर्माण होणाऱ्या गुंतागुंत याला प्रतिबंध करणे व त्याचे योग्य व्यवस्थापन करणे हा मुख्य उद्देश या कार्यक्रमाचा आहे. शासनाने किशोरवयीन करता काही उद्दिष्ट ठेवलेल्या आहेत जसे किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या आरोग्यविषयक विषयी समुपदेशन व जनजागृती करणे.

सुरक्षित व गर्भपात संबंधी सुविधा पूरविने.प्रजनन व लैंगिक आजाराबाबत जनजागृती करणे व त्यात सहभाग मित्रांचा सहभाग वाढविणे. त्याचप्रमाणे किशोरवयीन मुला-मुलींना त्यांच्या आरोग्याविषयी च्या समस्यांबाबत माहिती देणे किशोरवयीन आरोग्य अंतर्गत विविध आरोग्य सेवा देण्यात येतात.या आरोग्य सेवा किशोरवयीन आरोग्य क्लिनिक, शाळा कॉलेज व कार्य क्षेत्रांमध्ये बाहेर संपर्क कार्यक्रम आयोजित करून दिले जातात किशोरवयीन आरोग्य क्लिनिक हे राज्यात निवडलेल्या उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आहेत. तसेच सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये क्लिनिक कार्यरत आहे.

प्रत्येक क्लिनिक मध्ये प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी आरोग्यसेविका किंवा स्टाफ नर्स आहेत जिल्हा रुग्णालयांमध्ये किशोरवयीन आरोग्य समुपदेशक कार्यरत आहेत ते किशोरवयीन ना किशोरवयीन मुला-मुलींना मार्गदर्शन व समुपदेशन करतात. किशोरावस्था मध्ये मुला-मुलींना योग्य मार्गदर्शन मार्गदर्शनाची अतिशय गरज असते पालकांनी या वयामध्ये मुलांकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे मुलांचे पोषण, सकस आहार,खेळ, आवडीनिवडी, छंद, व्यायाम याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. या वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले मिळाल्या तर आरोग्य विषयक समस्या सुटून सशक्त नागरिक बनण्यास मदत होईल.

Leave a Comment

x